

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या पदासाठी एकूण १६९ अर्ज आले होते. त्यातील २८ जणांनी निवड पहिल्या यादीत करण्यात आली आहे. यामध्ये विद्यापीठातील प्रा. डॉ. विजय फुलारी, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांचा समावेश आहे. या शिवाय प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे (सांगली), प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवल (सातारा) या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांचीही निवड झाली आहे.
हेही वाचा - तो कॉल आला आणि आयुक्त का झाले अवाक् ?
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाल १७ जूनला संपला. त्यानंतर शोध समिती गठित केली. कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी १६९ अर्ज आले. यामध्ये शिवाजी विद्यापीठातील बारा ते पंधरा प्राध्यापकांनी अर्ज केले होते. तसेच राज्यातील विविध विद्यापीठातून अर्ज आले होते. याशिवाय दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातूनही काही प्राध्यापकांनी अर्ज केले होते. अर्जांची छाननी करून २८ जणांची यादी तयार केली. सर्वांची २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडिओकाँन्फरन्सद्वारे मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यातून पाच जणांची निवड करण्यात येईल. या पाच जणांमधून कुलपती (राज्यपाल) एका व्यक्तीची कुलगुरू म्हणून निवड करतील.
हेही वाचा - सावधान, घराबाहेर पडताय
पहिल्या यादीतील नावे
डॉ. के. सी. देशमुख (नागपूर), डॉ. जी. एन. शिंदे (नांदेड), डॉ. प्रदीप कुंडले (नागपूर), डॉ. एस. बी. देओसरकर (बाटू, लोणेरे), डॉ. अंजली कुरणे (पुणे), डॉ. अनुभा खाले (एस.एन.डी.टी), डॉ. एल. एम. वाघमारे (नांदेड), डॉ. डी. जी. कणसे (सांगली), डॉ. एम. बी. मुळ्ये (औरंगाबाद), डॉ. दीपक पानसकर (नांदेड), डॉ. आर. व्ही. शेजवल (सातारा), डॉ. मिलिंद उमेकर (नागपूर), डॉ. नितीन देसाई (मुंबई), डॉ. अविनाश कुंभार (पुणे), अनिराव पैला (बेंगलुरू), डॉ. विजय फुलारी (कोल्हापूर), डॉ. दिलीप पांगवव्हणे (नाशिक), डॉ. आर. एस. अवसाठी (लातूर), डॉ. डब्ल्यू. के. सरवदे (औरंगाबाद), डॉ. पी. पी. माहुलीकर, डॉ. डी. टी. शिर्के (कोल्हापूर), डॉ. रवींद्र परदेशी (पुणे), डॉ. संजीव सोनवणे (पुणे), डॉ. विनायक देशपांडे (नागपूर), डॉ. बी. पी. रंघे (पंढरपूर), डॉ. आनंद भालेराव (पुणे), डॉ. गीता लाटकर (नांदेड), डॉ. एम. व्ही. काळे (औरंगाबाद)
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.